थेट मजकुराकडे जा
सगळे बाइट्स
टॅक्सइन्फोग्राफिक

Old की New टॅक्स रिजीम? ६० सेकंदात सगळा फरक

टॅक्स रेट कमी हवा की डिडक्शन जास्त? दोन्ही रिजीम एकाच कार्डात समजून घ्या, आणि कुठली निवडायची ते ठरवायला एकच साधा प्रश्न.

हातात कॅल्क्युलेटर घेऊन एक तरुण दोन रस्त्यांच्या मधोमध उभा आहे — एका बाजूला पावत्यांचा ढीग, दुसरीकडे मोकळा साधा रस्ता, आणि वर एक तराजू
24 Sept 20261 मिनिट वाच

दर वर्षी ऑफिसमध्ये HR चा तोच मेल येतो: "Old regime घेणार की new?" आणि आपण गोंधळतो. बजेट २०२५ मधल्या रेट्सप्रमाणे दोन्हीतला फरक एका कार्डात बघू.

Old Regime (जुनी)

New Regime (नवी)

टॅक्स रेट
स्लॅब रेट जास्त (₹१० लाखांच्या वर थेट ३०%)
रेट कमी, स्लॅब जास्त (३०% फक्त ₹२४ लाखांच्या वर)
इतक्या उत्पन्नापर्यंत टॅक्स शून्य
₹५ लाख टॅक्सेबल इन्कम
₹१२ लाख टॅक्सेबल इन्कम (पगारदारांना ₹१२.७५ लाख)
स्टँडर्ड डिडक्शन (पगारातून आपोआप वजा होणारी रक्कम)
₹५०,०००
₹७५,०००
डिडक्शन्स (PPF, ELSS, इन्शुरन्स, HRA, होम लोन)
मिळतात — टॅक्स लागणारं उत्पन्न बरंच कमी करता येतं
बहुतेक मिळत नाहीत
कागदपत्रांची झंझट
प्रूफ्स, इन्व्हेस्टमेंट डिक्लरेशन सगळं द्यावं लागतं
एकदम सोपं — फार काही सांभाळायचं नाही
डीफॉल्ट कुठली?
ही हवी असेल तर स्वतः निवडावी लागते
हो, काही न केल्यास हीच लागू होते

स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा

Animation: a balance scale tips between the old regime with many deductions and the new regime with lower rates.OLD · Deductions%NEW · Low ratesWhich saves more?
Watch: deductions vs lower rates

तुमचे डिडक्शन्स किती होतात?

घरभाड्याचा HRA, होम लोनचं व्याज, 80C मधली गुंतवणूक, हेल्थ इन्शुरन्स — हे सगळं मिळून मोठी रक्कम होत असेल, तर old regime अजूनही फायद्याची ठरू शकते. एवढं काही नसेल, तर new regime सहसा सोपी पण आणि स्वस्त पण पडते.

झटपट लक्षात ठेवायचे ठोकताळे

  • नुकतीच नोकरी लागलीये, मोठे डिडक्शन्स काही नाहीत? तर new regime बहुतेक वेळा बरी पडते.
  • पुणे-मुंबईसारख्या शहरात भाड्याने राहताय, होम लोन चालू आहे, आणि टॅक्स वाचवायला गुंतवणूकही करताय? मग दोन्हीचा हिशोब करून बघा — old regime मध्ये जास्त पैसे वाचू शकतात.
  • पगारदार आहात? रिटर्न भरताना साधारणपणे दर वर्षी रिजीम बदलता येते, त्यामुळे एकदा घेतली म्हणजे कायमची असं नाही.

उपयोगी वाटलं?

आज ज्याला गरज आहे त्या एकाला फॉरवर्ड करा — आई-वडील, मित्र, सहकारी.

© FinBites.org · फक्त शैक्षणिक वापर · परवानगीशिवाय पुन्हा प्रकाशित करू नका. सेवा अटी

शिकत रहा

आई आणि मुलगी घरी पगाराची स्लिप आणि कागदपत्रं तपासताना — नवरात्री दिवस ६, आयकर समजून घेणे
गोष्ट
बँकिंग

आपण कमावलेल्या पैशांतले जास्त पैसे आपल्याकडे कसे ठेवता येतील?

10 मिनिट वाच
काचेच्या इमारती असलेल्या आधुनिक भारतीय ऑफिस पार्क आणि प्लाझाचा उजळ दिवसाचा देखावा
6 मिनिट वाच
शेअर मार्केट

REIT पैसे कसा कमावतो? भाड्यापासून तुमच्या खात्यात पैसे येईपर्यंत

6 मिनिट वाच