Skip to content

Our story

आमची गोष्ट

Money, made simple for every Indian

पैसे — प्रत्येक भारतीयाला समजेल असं सोपं

FinBites turns confusing money topics into bite-sized visuals and real-life stories anyone can understand in two minutes.

FinBites गोंधळात टाकणारे पैसे-विषय छोटे दृश्य आणि खऱ्या जीवनातील गोष्टींमध्ये मांडतो — दोन मिनिटांत सगळ्यांना समजेल असं.

The people behind FinBites

FinBites मागची माणसं

Who runs FinBites

FinBites कोण चालवतो?

Harshada Galankar, founder of FinBites

Harshada Galankar

हर्षदा गाळणकर

Founder of FinBites

FinBites च्या संस्थापक

Harshada Galankar is a physics graduate and completed a certificate course in Corporate Accounts Management in Pune. At FinBites, she helps choose topics, write articles and review content. She focuses on everyday money questions that come up in Indian homes.

Many women already manage the household budget. Harshada wants them to bring that same confidence to conversations about saving for the future and deciding where to invest. She wants more women to feel comfortable asking questions and taking an active part in their family’s financial decisions.

That’s the idea behind FinBites. It explains saving, investing and managing money in simple English and Marathi, using examples from everyday life. Harshada wants readers to understand what they’re putting their money into, spot the warning signs of a scam and feel confident making their own decisions.

FinBites is free to read and provides general financial education. It doesn’t sell or recommend financial products. Read the FinBites disclaimer.

हर्षदा गाळणकर यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांनी पुण्यात कॉर्पोरेट अकाउंट्स मॅनेजमेंटचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. FinBites साठी विषय निवडणं, लेख लिहिणं आणि मजकूर तपासणं या कामांत त्यांचा सहभाग असतो. आपल्या घरांमध्ये रोजच्या व्यवहारात पैशांबद्दल जे प्रश्न पडतात, त्यांवर त्यांचा विशेष भर असतो.

अनेक महिला घरचा खर्च सांभाळतात. त्याच आत्मविश्वासाने त्यांनी भविष्यासाठी किती बचत करायची आणि पैसे कुठे गुंतवायचे, याबद्दलही बोलावं, असं हर्षदा यांना वाटतं. महिलांनी मनातले प्रश्न मोकळेपणाने विचारावेत आणि कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये पुढाकार घ्यावा, हा त्यांचा उद्देश आहे.

याच विचारातून FinBites सुरू झालं. बचत, गुंतवणूक आणि पैशांचं नियोजन या गोष्टी इथे रोजच्या आयुष्यातल्या उदाहरणांतून सोप्या इंग्रजीत आणि मराठीत समजावून सांगितल्या जातात. आपण नेमके कशात पैसे गुंतवतोय हे वाचकांना समजावं, फसवणुकीची चिन्हं ओळखता यावीत आणि स्वतःचे निर्णय आत्मविश्वासाने घेता यावेत, अशी हर्षदा यांची इच्छा आहे.

FinBites वरचं सगळं मोफत वाचता येतं. इथला मजकूर सर्वसाधारण आर्थिक शिक्षणासाठी आहे. FinBites आर्थिक उत्पादनांची विक्री किंवा शिफारस करत नाही. FinBites चा डिस्क्लेमर वाचा.

Why we started

Everyone should be able to understand their money and have a say in what happens to it. That’s why we started FinBites.

We want the person earning their first salary to know where to start. We want the woman who manages her household budget to feel confident taking part in the family’s investment decisions. And we want anyone offered a scheme that promises easy returns to know what questions to ask before handing over their savings.

FinBites makes financial education free and easy to understand. We explain saving, investing and protecting your money in simple English and Marathi, using examples from everyday life in India. We don’t sell financial products. We help you understand your options so you can decide for yourself.

And when something clicks, share it at home. One conversation about money can help someone you love make a better decision.

आम्ही का सुरू केलं

प्रत्येकाला आपले पैसे कसे सांभाळायचे हे समजायला हवं. ते पैसे कुठे आणि कसे वापरायचे, या निर्णयात आपलंही मत असायला हवं. म्हणूनच आम्ही FinBites सुरू केलं.

पहिला पगार हातात आला की पैशांचं नियोजन कुठून सुरू करायचं, हे कळावं. घरचा खर्च सांभाळणाऱ्या महिलांना कुटुंबाच्या गुंतवणुकीच्या निर्णयांमध्येही आत्मविश्वासाने भाग घेता यावा. आणि ‘सहज भरपूर नफा मिळेल’ असं कुणी सांगितलं, तर आपली बचत त्या योजनेत टाकण्याआधी कोणते प्रश्न विचारायचे, हे माहीत असावं.

FinBites वर पैशांबद्दल शिकणं सोपं आहे आणि सगळं मोफत वाचता येतं. बचत कशी करायची, गुंतवणूक कशी चालते आणि आपले पैसे सुरक्षित कसे ठेवायचे, हे आपण रोज पाहतो अशा उदाहरणांतून सोप्या इंग्रजीत आणि मराठीत सांगतो. आम्ही कोणतीही आर्थिक उत्पादनं विकत नाही. तुमच्यासमोरचे पर्याय समजून घ्यायला आम्ही मदत करतो, म्हणजे निर्णय तुम्हाला स्वतः घेता येईल.

इथे एखादी गोष्ट नीट समजली की ती घरच्यांनाही सांगा. पैशांबद्दलच्या एका छोट्याशा गप्पेतूनही आपल्या जवळच्या कुणाला चांगला निर्णय घेता येऊ शकतो.

What we publish

आम्ही काय प्रकाशित करतो

Visual cards and infographics

व्हिज्युअल कार्ड आणि इन्फोग्राफिक

One idea, one glance.

एक कल्पना, एक नजर.

3-step carousels

३-पावली कॅरोसेल

Swipeable how-to guides.

स्वाइप करता येणारे हाऊ-टू.

Story analogies

गोष्टी आणि उदाहरणं

Mango trees, chai stalls and family conversations.

आंब्याची झाडं, चहाची टपरी, घरची गप्पा.

Quick reads

छोट्या वाचा

Simple explainers when you want a bit more depth.

थोडी जास्त माहिती हवी असेल तेव्हा सोपे स्पष्टीकरण.

Our promise

आमचं वचन

  • No stock tips, buy/sell calls or product pushing — ever.
  • Plain language, checked against official sources.
  • Free for everyone, with Hindi and regional languages on the way.
  • शेअर टिप्स, खरेदी-विक्री कॉल किंवा प्रॉडक्ट विकायला लावणं — कधीच नाही.
  • साधी भाषा, अधिकृत स्रोतांशी तपासलेली.
  • सगळ्यांसाठी मोफत; हिंदी आणि प्रादेशिक भाषाही येत आहेत.